आम्ही पोट भरण्यासाठी नाचतो, तमाशा समजू नका

Foto
मुरळी कलावंतांनी मांडल्या संघर्षाच्या कथा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): आजकाल लोक जागरण-गोंधळातही तमाशासारखी अपेक्षा करू लागले आहेत. पूर्वी एका कार्यक्रमात ५-६ वाघ्या आणि केवळ एक मुरळी असायची. पण आता आयोजक ४-५ मुरळ्यांची मागणी करतात. पण आम्ही स्पष्ट सांगतो, हा देवाचा कार्यक्रम आहे, तमाशा नाही! पोट भरण्यासाठी अंगावर पदर घेऊन वावरातो अशी ठाम भूमिका घेतो. पण या पवित्र परंपरेला लोक जेव्हा विकृतीची जोड देतात,
जनविल्
तेव्हा जीवाला चटके बसतात, अशा शब्दांत जागरण गोंधळ सादर करणाऱ्या मुरळी कलावंतांनी आपल्या व्यथा मांडल्या.
नवरात्रीनिमित्त आस्था जनविकास संस्थेतर्फे सातारा परिसरातील आद्येश्वरी सभागृहात मुरळी कलावंतांचा सत्कार आणि मुक्त संवादाचा जागरण जगण्याचं
हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षा मीरा कावळे, आशाताई चोपडे, रोशनी गायकवाड आणि निकिता वाघ या कलावंतांची उपस्थिती होती. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. आरतीश्यामल जोशी आणि वैशाली नांदगावकर यांनी त्यांच्याशी
संवाद साधला. यावेळी समाजाची बदलती दृष्टी, मानधनासाठी होणारी हेळसांड आणि रोजच्या जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष सांगताना अनेकींना अश्रू अनावर झाले. त्आमचे भावविश्व आणि आमच्या व्यथा व्यक्त करण्याची संधी आम्हाला पहिल्यांदाच मिळाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. लघुउद्योग करणाऱ्या धनश्री हुडेकर, वैजापूरमध्ये पहिले कॅफे सुरू करणाऱ्या सृष्टी पालेजा आणि स्वच्छता साहित्याचे उत्पादन करणाऱ्या अक्षदा यांना आस्था सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions